आपण भेटायचो ती नदी
अजूनही खळाखळा वहातेय,
कारण आजही ती आतुरतेने
आपली वाट पहातेय...
रडणार कोणी असेल
तर मरणाला अर्थ आहे,
नाहीतर मरणाची कल्पना सुद्धा
वाया अन् व्यर्थ आहे.
जगावं त्या दिव्याप्रमाणं
दिव्य ज्योत घेऊन,
दुस-यांना उजेड द्यावा,
स्वतःला अंधारात ठेऊन.
देवाच्या मनात आलं आणि
त्यानं माणसाला बनवलं,
५ रुयांचा नारळ देऊन मग,
माणसानेच देवाला 'बनवलं'।
'मला विसरुन जा'
असं पत्र मला दिलंस,
पत्राच्या शेवटी मग
'तु़झीच' असं का लिहीलंस?
Saturday, August 23, 2008
Subscribe to:
Posts (Atom)