Wednesday, July 9, 2008

काही चारोळ्या ...

बांधून रेशीमगाठी मनांच्या
तोच खाली पाठवतो ,
मग कितीही येवोत अडचणी
तोच दोघांना भेटवतो।

कधी कधी तिची आठवण डोळ्यात पाणी आणते
देत थोड़ा दिलासा मलाच मग म्हणते ,
तिने यावे तुझ्या जीवनात अस मलाही वाटते
म्हनुनच मी आल्यावर तुझ्या डोळ्यात पाणी दाटते ।

मन माझ वेड
इकडे तिकडे भरकटतय,
कल्पनेतल जग
कागदावर रेखाटतय.

Tuesday, July 8, 2008